भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील श्री भगवान झुलेलाल मंदिरापासून बुधवारी दुपारी दोन वाजता शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत सजवलेल्या रथावर श्री झुलेलाल भगवान प्रतिमा ठेवण्यात आली व बेहराणा साहबांची मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शहरातील जामनेररोड, अष्टभुजा देवी मंदिर, नृसिंह मंदिर, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मी चौक, सराफ बाजार या मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीचा रात्री मॉडर्न रोडवर समारोप झाला.

मिरवणूक मार्गावर आतषबाजी
मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर रात्री तापीनदीवर बहेराणा साहेब यांचे विसर्जन झाले. सिंधी कॉलनीत मिरवणूकीवर पुष्पवृष्टी झाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सच्चोसतराम चौक, छोटा सेवा मंडळ, जामनेनरोड आदी ठिकाणी थंड पाणी व प्रसाद वितरण झाले. शोभायात्रेत महिलांचे नृत्य पथक, लक्षवेधी ठरले.
झुलेलाल उत्सवाचा समारोप
सिंधी कॉलनीतील सच्चो सतराम चौकात माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांच्या माध्यमातून श्री झुलेलाल उत्सव सुरू करण्यात आला होता. नवरात्रोत्सव व गणेशोत्सवाप्रमाणे हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उत्सवाचा चेट्री चंड्र निमित्ताने समारोप करण्यात आला. या उपक्रमात दररोज सकाळ व सायंकाळी आरती, महापुजा झाली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
उत्सव यशस्वीतेसाठी जय झुलेलाल चॅरीटेबल ट्रस्ट भुसावळचे अध्यक्ष नारायणदास छाबडा, उपाध्यक्ष मनोहरलाल सोढाई, चेट्रीचंड्र महोत्सव समितीचे अध्यक्ष महेश कुमार मनचुडिया, उपाध्यक्ष दिनेश कुमार दोदानी, धर्मा शदानी व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
डॉ.केतकी पाटील यांनी दिली भेट
श्री संत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी भुसावळ येथे निर्मित संत झुलेलाल महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सिंधी बांधव, भगिनींशी संवाद साधून चेट्रीचंड्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी भुसावळ शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष जितू प्रकाशलाल माखीजा, माजी नगरसेवक निकी रमेश बत्रा, समाजसेवक अजय मंधानी, चेट्रीचंड्र उत्सव समिती अध्यक्ष महेश मंचुरिया, रिंकू खेलानी, अजय अटवाणी, केशव गिलानी, निखिल नैनानी, झुलेलाल मंदिराचे अध्यक्ष नारायणदास छाबडीया, सिरवानी आदी उपस्थित होते.


