भुसावळात 20 हजार बांधवांनी केले सामूहिक नमाज पठण –

भुसावळ : शहरातील खडका रोडवरील नवीन इदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी 8.30 ते 9.25 या वेळेत शहरातील सुमारे 20 हजारांवर मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज अदा केली. जामनेर रोडवरील जुन्या इदगाह येथेही नमाज अदा करण्यात आली. यावेळी बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात.
गुरूवारी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खडका रोडवरील नवीन ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी 8.30 ते 9.25 पर्यंत सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी आबाल वृध्दांची मोठी गर्दी होती. शहरातील विविध भागातून नमाज अदा करण्यासाठी मैदानावर गर्दी झाली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक गजानन राठोड यांनीही मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. खडकारोड इदगाहवर मौलाना रिहान रजा होते तर जामनेर रोडवरील जुन्या इदगाहवर मौलाना जुबेर शेख होते.