भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर मागील वर्षी मुख्य पाईप लाईनचे व्हॉल बसविण्याचे काम मक्तेदारांकडून करण्यात आले होते.मात्र गेले आठवड्याभरापासून मुख्य पाईप लाईनचा व्हॉल लिकीज झाल्याने पाणी रस्त्यावर साचत असून दोन दिवसांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येवून ठेपल्याने मिरवणुकीच्या मार्गावर रस्त्यामध्ये पाणी साचल्याने अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतांना दिसत आहे.

माहिती अशी की,मागील वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आधीच मक्तेदाराने मुख्य पाईप लाईनचे व्हॉल बसविण्याचे काम पूर्ण केले होते व याच मार्गाने बाबासाहेबांच्या मिरवणुकीची उत्साहात पार पडल्या होत्या मात्र गेले आठवड्याभरापासून मुख्य पाईप लाईनचा व्हॉल लिकीज झाला असून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचे पाणी उडत असल्याने भांडण उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तात्काळ मुख्य पाईप लाईनचे लिकीज बंद करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरीकांकडून होतांना दिसत आहे.


