श्री प्रभू रामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी भुसावळकर सज्ज : शहर झाले भगवेमय: श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन : शहरात रामभक्तांची भव्य बाईक रॅली” ;

भुसावळ – अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्री प्रभु रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने श्री प्रभू रामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठेसाठी भुसावळकर सज्ज झाले असून शहरात ठिकठिकाणी स्वागत होर्डिंग , भगवे झेंडे , पताका लावण्यात आल्या असून शहर भगवेमय:झाले आहे , तसेच शहरातील विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . याअंतर्गत येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान तर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

येथील विठ्ठल मंदिर वार्डातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान यांच्या वतीने रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दीपोत्सव व आरती तसेच रात्री आठ वाजता श्याम खाटु भजनी मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे.
22 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजे दरम्यान गीता पारायण. सकाळी नऊ वाजता अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील सातशे विद्यार्थिनीची प्रभात फेरी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थीनींना संस्थे तर्फे अल्पोपहार देण्यात येणार आहे. दुपारी चार दिंडी सोहळा व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सांयकाळी सात वाजता महाआरती व प्रसाद वाटप करण्यात येईल. मंगळवार दि 23 रोजी दीपोत्सव व महाआरती होईल असे आयोजक सुहास फालक व प्रशांत बऱ्हाटे यांनी कळविले आहे.

शहरात रामभक्तांची भव्य बाईक रॅली”

आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत प्रभु श्रीरामांच्या मंदिर निर्माण उत्सवा निमित्त दिनांक 21 जानेवारी रविवार रोजी तापी पब्लिक स्कूल जामनेर रोड येथून सकाळी ९ वाजता भुसावळ शहरातील रामभक्तांची भव्य अशी “प्रभु श्रीराम बाईक रॅली” आयोजित करण्यात आली आहे लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, येथे समारोप होणार आहे तरी सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये सहभागी होऊन व प्रभू श्रीरामांच्या ऐतिहासिक मंदिर निर्माण उत्सवाचे साक्षीदार व्हावे..असे आयोजक सर्व प्रभू श्रीराम भक्त भुसावळ शहर यांनी केले आहे .