इंधन बचाव मासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने इंधन बचाव करण्याऱ्या चालकांचा सत्कार करावा – नाना पाटील सर

भुसावळ – :जपासून दि16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालणाच्या मासिक इंधन बचाव मोहीमेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भुसावळ एस टी डेपो समिती सदस्य तथा पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष नाना पाटील सर यांनी
एसटी महामंडळ जवळपास 19 हजार 800 गाड्यातून रोज जवळपास 70 लाख प्रवाशांची प्रवासी वाहतुक करते . एसटीला सेवा देण्यासाठी जवळपास 12 लाख 20 हजार लिटर डिझेल लागते. डिझेलचे दर वाढले त्यामुळे एसटीच्या खर्चात वाढ होत आहे. अशा स्थितीत प्रवासी सेवा देताना अर्थिक खर्चाच्या अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी इंधन बचत करावी लागते. यासाठी हा महिना इंधन बचत म्हणून साजरा केला जातो . हे कार्य फक्त महिन्यासाठी नाही तर कायम आपल्याला इंधन बचत करून राष्ट्रसेवेला मदत करावयाची आहे . असे सांगून चालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून चालकांचा करावा सत्कार करावा एसटी चालकांना योग्य प्रशिक्षण देऊन गरजेपेक्षा जास्त इंधन लागणार नाही व तांत्रिकदृष्टया गाड्या परिपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करतील आणि कमीत कमी इंधन वापरून महिना भरात इंधन बचत करतील . ड्रायव्हीग बाबत सतर्क राहून कोणतेही व्यसन नसेल अश्या चालक बंधुचा प्रत्येक महिन्याला नवनविन चालकांचा सत्कार डेपो व्यवस्थापक यांनी वरीष्ठांना कळवून केला तर त्या चालकांना व इतर चालकांना ही प्रोत्साहन मिळेल व इंधन बचत ही होऊ शकेल यानिमित्ताने आपल्या राष्ट्रासाठी ही उत्कृष्ट कार्य होईल असे याप्रसंगी प्रमुख वक्ते व उद्घाटक नाना पाटील सर यांनी इंधन बचाव मासिक निमित्ताने उद्घाटन प्रसंगी सांगितले .
डेपो व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी एसटीच्या आगाराच्या कार्यशाळेत चालकांना मार्गदर्शन केले .
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक नाना पाटील सर आगार व्यवस्थापक राकेश शिवदे , डेपो व्यवस्थापक पी.बी भोई श्री तडवी

आदी व्यासपिठावर उपस्थित होते मोठ्या प्रमाणात वाहक चालक व तांत्रिक कर्मचारी मोठ्य प्रमाणात उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवकर यांनी तर आभार भोई यांनी मानले

इंधन वाचवा साठी चालकांना दिल्या टिप्स
एसटी चालकांसाठी सुचना अशा:

  • गाड्या सुरू ठेवून जास्त वेळ थांबू नये
  • जास्त वेळ गाडी थांबणार असल्यास गाडी बंद करावी
  • महामार्ग, राज्य मार्गावर वेग नियमांचे अचूक पालन करावे
  • गाडी डेपोतून बाहेर काढताना तांत्रीक बाजू तपासूनच बाहेर काढा .