.भुसावळ – दिनांक २२/१/२०२४ रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर सदर आनंदोत्सव सोहळा प्रत्येक भारतीयांना साजरा करता यावा यासाठी दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी, ड्राय डे, मास विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात यावी. तसेच त्या पवित्र दिवशी ड्राय डे घोषित करावा अशी मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन भुसावळ प्रांताधिकारी विजय पाटील यांना देण्यात आले आहे . निवेदनावर
सचिन जगताप , देवेंद्र वराडे (आप्पा) , धीरज जाधव
, कल्पेश पाटील , रोहित महाले , सौ.राजश्री नेवेसौ. माया चौधरी , वंदना झांबरे चेतनकुमार जैन आदींच्या सहया आहेत



