देविदास वाणी ‘दर्पणकार’ पुरस्काराने सन्मानीत ;

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे (मुंबई) जळगाव जिल्हा शाखातर्फे देविदास वाणी यांना ‘दर्पणकार’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी,उच्च शिक्षण विभागाच्या जळगावचे सहसंचालक डॉ. संजय ठाकरे, माध्यम शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सुधीर भटकर, पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा उपस्थित होते.
विद्यापिठाचे कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा सुंदर संधी मिळाल्याची आनंदी भावना वाणी यांनी व्यक्त केली . या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .