फैजपूर पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीत सर्वात मोठी कारवाई : १ कोटीं १७ लाखाचा मुद्देमाल जप्त.४ जणांना अटक :


फैजपूर –
फैजपूर पोलिसांना अवैध गुटखा वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे कामी सर्वात मोठी कारवाई आमोदा गावाजवळील कुंदन हॉटेल जवळ केली असून यात सुमारे ८३ लाख रुपयाचा दोन आयशर मालवाहतूक वाहनांमध्ये भरलेला गुटखा जप्त करण्यात आला तसेच गेल्या १५ दिवसांपूर्वी फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत न्हावी गावातून सव्वा पाच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता या कारवाई मूळे फैजपूर परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात गुटखा अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तर प्रमुख सूत्रधाराचा व्यवसायिकाचा शोध पोलीस करीत आहे
गेल्या १५ दिवसांपूर्वी न्हावी गावात सव्वा पाच लाखाचा गुटखा पान मसाला विकणाऱ्या वर कारवाई झाल्याने फैजपूर शहरातील व्यापारी वर्तुळासह न्हावी गावात मोठी खळबळ उडाली होती. भुसावळ रोडवर आमोदा गावा जवळून गुटख्याची अवैध तस्करी वाहतूक होत असल्याची गुप्त खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसह बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला आणि आमोदा गावाजवळ हॉटेल कुंदनजवळ आयशर क्रमांक (एम. एच. 19 सी.वाय.9364 व एम.एच.19 सी.एक्स.0282) आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणली.पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली 83 लाख सहा हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा सुगंधित आरोग्यास हानिकारक असा पान मसाला जप्त केला तर 34 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण १ कोटी १७ लाख ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यात ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी ( 33 कोडगाव,ता.चाळीसगाव,ह.मु. शास्त्रीनगर,चाळीसगाव), जयेश सुभाष चांदलकर (33, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (29, रामेश्वर कॉलनी,जळगाव) व मंगेश सुनील पाटील (31, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) यांना अटक करण्यात आली.विशेष म्हणजे दोन्ही आयशर वाहनामागे टाटा हॅरीअर ही गाडी पोलिसांवर लक्ष ठेवून असल्याने या गाडीतील चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे.तर हा गुटखा आपला असल्याचा दावा पाटील यांनी केल्याचे समजते. हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरूनसंशयित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर,कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार,अपरपोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ,पोलिस उपनिरीक्षक मैनूदीन सैय्यद,उपनिरीक्षक मोहन लोखंडे,हवालदार गोकुळ तायडे,हवालदार विकास सोनवणे,हवालदार उमेश चौधरी,सहाय्यक फौजदार देविदास सुरदास, चालक अरुण नमायते आदींच्या पथकाने केली.