डॉ. जगदीश पाटील यांना कार्यगौरव सन्मानपत्र

भुसावळ – येथील भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांच्या हस्ते डॉ. जगदीश पाटील यांना कार्यगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे दरवर्षी पत्रकारितेसह इतर क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सन्मानपत्र देऊन गौरव केला जातो. यावर्षीचे कार्यगौरव सन्मानपत्र डॉ. जगदीश पाटील यांना प्रदान करण्यात आले. बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य, संत साहित्यात पीएच.डी., नेट परीक्षा उत्तीर्ण तसेच मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांचे हस्ते शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त डॉ. जगदीश पाटील यांचा कार्यगौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्राचे शब्दांकन व वाचन माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी केले. यात त्यांनी डॉ. जगदीश पाटील सर यांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा घेतला. यावेळी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल व जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके, ऊर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष हारून नदवी तसेच भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील अॅड. नितीन खरे, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, आदी मान्यवरांसह पत्रकारांची उपस्थिती होती.