भुसावळ किन्ही एमआयडीसी ला जोडणाऱ्या शिवपूर- कन्हाळे मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था :

भुसावळ : शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या भुसावळ किन्ही औद्योगिक परिसरात अवजड वाहनांसाठी मुख्य रास्ता म्हणून शिवपूर- कन्हाळे रस्त्याचा वापर औद्योगिक परिसर व पुढील गावात मध्ये येण्या जाण्यासाठी केला जातो. मागील काही वर्षात शिवपूर- कन्हाळे रस्त्यालगत लोकवस्ती वाढलेली आहे. शाळा, शॉपिंग, कॉम्प्लेक्स ह्यामुळे हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो, शिवाय औद्योगिक परिसरात येणारे अवजड वाहने ह्याच रस्त्याचा वापर करत असतात, भुसावळ एमआयडीसी मधील भुसावळ इंडस्ट्रियल मॅनुफॅक्चरींग असोसिएशन ( बिमा) ह्या उद्योजकांच्या संघटनेने हा विषय आमदार संजय सावकारे ह्यांच्या समोर मांडला, त्या प्रमाणे अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्यात व रस्त्याच्या डागडुजी व नूतनीकरण संधर्भात सूचना करण्यात आले परंतु ३ महिने उलटून सुद्धा मुख्य रस्त्याचा विषय मार्गी लागत नाही. तोच प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे खराब झालेल्या रस्त्याचे नूतनीकरण तर सोडा साधी रस्त्याला डागडुजी पण झालेली नाही, प्रशासनाच्या ह्या उदासीन कारभारामुळे एमआयडीसी मधील उद्योजकांमध्ये कमालीची नाराजी आहे, संपूर्ण शिवपूर- कन्हाळे रस्ता खराब झाल्यामुळे ह्या रस्त्यावर अपघात सुद्धा वाढलेले आहेत व ह्या खराब रस्त्यामुळे औद्योगिक परिसरात येणाऱ्या मालाची हेळसांड व नुकसान कमी व्हावे यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी हि मागणी ,बीमा असोसिएशन चे अध्यक्ष अश्विनीकुमार परदेशी यांच्यातर्फे करण्यात आली आहे,
आमदार संजय सावकारे व प्रशासनाने गांभीर्याने बघण्याची मागणी बिमा असोसिएशन व इतर रहिवास्यांकडून केली जात आहे

पावसामुळे रस्ता आणखीन बिकट

शहरातील बेरोजगारी हा नेहमीच चिंतेचा व ज्वलंत विषय आहे हळूहळू एमआयडीसीच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळत आहे मात्र ज्या एमआयडीसीला जाण्यासाठी दळणवळण ची चांगली सोय पाहिजे अर्थात रस्ता चांगला पाहिजे त्या ठिकाणी राष्ट्राची दयनीय अवस्था झाली असून गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे तर संपूर्ण रस्त्यामध्ये पाणी साचले आहे मोठमोठे खड्डे सुद्धा पडले आहे.

फोटो कॅप्शन :-
एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे .लवकरच नवीन रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी बीमा असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.