मलकापुर आगारातील बस चालक महिलेने जलतरणात पटकाविले दोन सुवर्ण पदक

मलकापुर:- नाशिक येथे झालेल्या चौथी राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत मलकापूर आगारातील चालक तथा वाहक सौ सोनाली पाटमासे यांनी विविध जलतरण प्रकारात दोन सुवर्ण व एक रौप्य असे एकूण तीन पदकांची कमाई केली सौ सोनाली पाटमासे यांचे उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल व जिंकून आल्याबद्दल मलकापूर आगार व विभागाचे नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध केल्याबद्दल मलकापूर आगारातर्फे आगार व्यवस्थापक मुकुंद न्हावकर व सहाय्यक वाहतूक अधीक्षक योगेश वांदे तसेच आगारातील चालक,वाहक व लिपिक कर्मचाऱ्यांतर्फे अभिनंदन करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.