मुक्ताईनगर – .४ डिसेबर पासुन सुरु होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी बेमुदत संपात मुक्ताईनगर अंगणवाडी सेविका कर्मचारी सहभागी होणार असल्या बाबतचे (संपात सहभागी ) निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिले .

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात कामे करणाऱ्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा देण्यात येऊन, अंगणवाडी सेविकांना- तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थश्रेणी लागु करण्यात यावीः
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा, दरमहा पेंशन योजना सुरू करा, सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे रुपांतरण मोठ्या . अंगणवाडी केंद्रात करावी, १० वी पास मदतनीसांना सेविका पदी थेट नियुक्ती द्यावी, अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल ताबडतोब द्या ! अंगणवाडी कर्मचायांना प्रोत्साहन भत्ता देण्यांत यावा.अंगणवाडी सेविकां मधुन पर्यवेक्षिकाची भरती वयाची अट न ठेवता करण्यात यावी . प्रोत्साहन भत्ता देण्यांत यावा! ‘ इ.स. २०२२ व २०२३ ची भाऊबीज व गणवेश दिवाळी अगोदर देण्यांत यावी !असे शासनाचे आदेश असताना देखील जळगाव -धुळे जिल्ह्यात बऱ्याच प्रकल्पांमध्ये .- .अजुनही भाऊबीज व गणवेश मिळालेली नाही मागील वर्षाची भाऊबीज चाळीसगांव व मुक्ताईनगर प्रकल्पांत वर्षा मुळतकर सह ७ सेविका मदतनीसांना भाऊबीज व सि. बीई मो बाईल रिचार्ज प्रोत्साहनभत्ता मिळालेली नाही . त्यांना ताबडतोब देण्यात यावी . व इतर मागण्या पूर्ण .होईपर्यंत, दिनांक ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांनी नोव्हेंबर महिन्याचे मासिक अहवाल वर बहिष्कार टाकण्यांत आला असून तसे निवेदन संघटनेचे सचिव भानुदास पाटील यांनी दिले त्यावेळी अंगणवाडी सेविका ज्योती बोराखेडे,निता दाते, सुवर्णा सोनवणे,आशा झाल्टे, वर्षा मुळतकर,सविता इंगळे,रेखा कापडे,शिला इंगळे,दुर्गा आगरकर,लक्ष्मी वानखेडे,मंदा चिंचोलकर,धिरोष्णा कासार,उज्वला चौधरी,कविता पवार,ताई पाटील,यादी अंगणवाडी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.


