भुसावळ। – आज दिनांक 13/07/2023 रोजी सकाळी तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तरी हतनुर धरणात येणाऱ्या येव्यानुसार टप्प्या टप्प्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सद्य स्थितीत हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1.00 मी. ने उघडे असून 560.00 घ.मी.प्र.से. /19779 क्यूसेस एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे .
हतनूर धरणा खालील ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की , कोणीही तापी नदी पात्रात जाऊ नये, तसेच गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडूनये व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच आवश्यक खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.



