नाशिक – राज्यातील बसचा अपघाताची मालिका सुरूच असून आज १२ रोजी पहाटे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात असलेले वणीच्या सप्तशृंगी गडावरूनक खाली येत असताना एसटी बस थेट २०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये २३ प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज बुधवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची ही बस आहे. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
सर्व जखमी प्रवाशांना वणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य पूर्ण करून जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष वणी रुग्णालयात आढावा घेत आहे.पहाटेच्या धुक्यामूळे चालकास वळणावर नेमका रस्ता लक्षात आला नाही व बस कठडा तोडून दरीत कोसळली यामुळे अपघात झाला असावा शक्यता वर्तवली जात आहे .
बस अपघातातील बहुतेक भाविक जळगाव जिल्ह्यातील ….
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयाने सप्तश्रृंगी गड बस दुर्घटनेमधील नावे जाहीर केली आहेत. या अपघातात १६ भाविक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
यात अकोला येथील गजानन पांडुरंग टपके (वय २५) अमळनेर तालुक्यातील मुडी येथील प्रमीलाबाई गुलाबराव बडगुजर (सुनिल गुलाबराव बडगुजर, मुलगा) वय ६५ , तर जळगाव तालुक्यातील भोकर येथील रघुनाथ बळीराम पाटील (वय ७०), बाळु भावलाल पाटील(वय ४८), गडावरील लक्ष्मीबाई काळू गव्हाणे (वय ४०), अमळनेर तालुक्यातील मुडी येथील संजय बाळीराम भोईर (वय ६०), सुशीलाबाई सोनू गुजर(वय २७), वच्छालाबाई साहेबराव पाटील(वय ६५), सुशिलबाई बबन नजान (वय ६४), निफाड तालुक्यातील पंचेश्वर येथील आशाबाई वामन सुर्यवंशी (वय ७५), सप्तश्रृंगी गड येथील यमुना रामदास गांगुर्डे (वय ४०), अमळनेर तालुक्यातील मुंडी येथील विमलबाई अक्रत भोई (वय ५९) प्रमिभा संजय भोई (वय ४५), जिजाबाई साहेबराव पाटील(वय ६५) शिरपूर तालुक्यातील खडकशिरपुर येथील ज्योती उमेश पाटील (वय २९), अमळनेर तालुक्यातील संगिता मंगुलाल भोई (वय ५६) रत्नाबाई ( नाव सांगता आले नाही), धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मुन्सी दगु खाटीक (वय ६८), अमळनेर तालुक्यातील मुडी येथील सुरेखाबाई हिरालाल बडगुजर (वय ४३), संगिता बाबुलाल भोई (वय ६०),भारगोबाई माधवराव पाटील (वय ५२), आशाबाई राजेंद्र पाटील (वय ५५) अशी जखमी भाविकांची नावे समोर आली आहे. त्यांच्यावर वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.


