हतनूर धरणांचे 30 दरवाजे उघडले – तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ :

भुसावळ – तालुक्यातील हतनूर धरणांचे दिनांक 13/07/2022 रोजी रात्री तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत 211.110 मी वाढ होत आहे.एकूण साठा 240.40 दलघमी असून हतनुर धरणात येणाऱ्या येव्यानुसार टप्प्या टप्प्याने एकूण साठा 61.96% धरण भरल्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे.यामुळे रात्री 10.00 वाजेला सद्य स्थितीत पाहून हतनूर धरणाचे 41 दरवाजे पैकी 30 दरवाजे 1.50 मीटरने उघडण्यात आले असून 2700 क्युमेक्स 95351 क्युसेक्स घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.
हतनूर धरणा खालील ग्रामस्थांना सुचित करण्यात आले आहे ,कोणीही तापी नदी पात्रात जाऊ नये तसेच गुरेढोरे व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच आवश्यक खबरदारी घेण्यात यावी असे जी.एस.चौधरी शाखा अभियंता यांनी सांगितले ,