भुसावळात महाराणा प्रताप यांची जयंती जल्लोषात साजरी : डीजेच्या तालावर व फटाक्यांच्या आतीष बाजीत शांततेत मिरवणूक :


भुसावळ – येथिल राजपूत समाज बांधवांतर्फे विर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती निमित्त सोमवारी शहरातील नाहाटा कॉलेज पासून संध्याकाळी पावणे सात वाजता आमदार संजय सावकारे व डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन करुण मिरवणूकीस प्रारंभ केला.
या वेळी दामोदर राजपूत,चंदू चव्हाण,श्याम गोविंदा,अभिजित पाटील,कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत,अनिल राजपूत,निलेश राजपूत,सोमनाथ पाटील,दिपक चौधरी,गुलाबसिंग पाटील,बुटासिंग चितोडीया,संदीप राणा,विक्की राजपूत,सुरेंद्रसिंग पाटील,सुरतसिंग पाटील,आनंदा पाटील,कैलाश पाटील,श्रीराम पाटील,प्रशांत राजपूत,किशोर राजपूत,आकाश राजपूत,सोनूसिंग राजपूत,उदयसिंग निकम,भैय्या महाजन,कुलदीप पाटील,संगीता पाटील,कविता पाटील,कविता राजपूत,दिपाली पाटील,हर्षा चौधरी,वंदना निकम,कमल बघेले,यमुनाबाई पाटील,प्रतिभा पाटील,देवयाणी पाटील,रूपाली चौधरी,सुरभी चौधरी,प्रियंका पाटील,भारती चव्हाण,रंजणा पाटील,प्रमिला पाटील,छाया राठोड,स्मिता राठोड,नंदा चानगुडे,दर्शन चांनगुडे,रूषीकेश राजपूत,चेतन राजपूत,भावेश राजपूत,किरण राजपूत,जितू राजपूत यांच्या सह संपूर्ण राजपूत समाज व इतर समाज बांधव उपस्थित होते.
आमदार संजय सावकारे यांनी पण मिरवणूकीत डीजेच्या तालावर नृत्य केले.
महिलांनीसुद्धा सुरवाती पासून मिरवणूकीत चांगला उत्साह दाखवला.मिरवणूकीत भुसावळ,जळगांव,नाशिक, कल्याण,लोणावळा,तळेगांव,पुणे,शिवपूर कन्हाळा,खडका, साकरी,कंडारी, दिपनगर,फैजपूर,वराडसीम,कुऱ्हा,चोरवड,साकेगांव येथून राजपूत समाज बांधावांनी हजेरी लावली होती.
मिरवणूक ही नाहाटा कॉलेज पासून जामनेर रोड,नवशक्ती कॉप्लेक्स,पांडूरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन समोरुन,पाणी गेट,हंबर्डीकर चौक समोरुण महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर रात्री दहा वाजता शांततेत समारोप झाला.महिलांनी व पुरुषांनी पिवळया रंगाचे वस्त्र परिधान केले होते. आयोजकांतर्फे सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आले होते.
मिरवणूकी प्रसंगी बाजारपेठ व शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त राखला.
जयंती उत्सव समिती तर्फे सर्व समाजबांधव याचे आभार दामोदर राजपूत यांनी मानले.