भुसावळ –
आपल्या कार्याच्या माध्यमातून जनमाणसात ठसा निर्माण करणारे भुसावळ विभागाचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची बदली नुकतीच संगमनेर येथे झाली . त्यांनी भुसावळ मध्ये जवळपास तीन वर्ष सेवा बजावत कर्तव्य व जबाबदारी अत्यंत चोखरित्या सांभाळली आहे . सुस्वभावी, कर्तव्यदक्ष, डॅशिंग नेतृत्व असले तरी प्रेमळ, शांत आणि सगळ्या नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणारे त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर सर्वसामान्य जनतेकडे असणे, त्यांच्याकडे डायरेक्ट जरी फोनवरून समस्या सांगितली तरी सोडविणारे अधिकारी अनेक गंभीर समस्या पण त्या सहज पणे सोडविणारे म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या अधिकाऱ्याची बदली सर्वासाठी धक्कादायक ठरली . अधिकारी यांना मात्र सेवाकाळ झाला आहे की बदली असतेच . बदली झाल्यामुळे साहेबांचा आपल्या सर्वांच्या मार्फत नागरिक सत्कार करण्याचे योजिले आहे. तेरापंथ भवन*
संतोषी माता हॉल शेजारी मातृभूमी चौक प्रोफेसर कॉलनी येथे
दिनांक 26 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता
नागरी गौरव सत्कार समितीतर्फे सत्कार करण्यात येत आहे
*या सत्कारासाठी भुसावळ व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राधेश्याम लाहोटी ,
अध्यक्ष व्यापारी असोसीएशन अध्यक्ष प्रतिष्ठा महिला मंडळ रजनी सावकारे , पर्यावरण जागर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष नाना पाटील सर ,जय गणेश फाउंडेशन अध्यक्ष उमेश नेमाडे जैन सोशल ग्रुप गौतम चोरडीया ,संस्थापक अध्यक्ष पत्रकार संघ अॅड नितिन खरे ,पोलिस पाटील संघटना प्रमोद पाटील ,ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक् रघुनाथ आप्पा सोनवणे, वकील बार असोशिएशन अध्यक्ष अॅड तुषार पाटील , डॉ. राजेश मानवतकर अध्यक्ष सामाजिक व्याखानमाला ,राजश्री सुरवाडेसामाजिक संस्था , डॉ. प्रा.प्रवीण पाटील , रनर ग्रुप प्रमुख , साबीर शेख , पदाधिकारी मणियार बिरादरी , डॉ. मकरंद चांदवडकर रोटरी क्लब भुसावळ ,
डॉ. लक्ष्मीकांत नागला
अध्यक्ष कल्याणी ट्रस्ट व रिदयम हॉस्पिटल आनंद ठाकरे
माजी सरपंच साकेगाव, सुरेद्रसिंग पाटील
समन्वयक शैक्षिक आगाज यांनी कळविले आहे .



