मध्यप्रदेश सरकारचे मुख्यमंत्री सिखो, कमाओ सारखे अभियान महाराष्ट्रात राबवा -शिशिर जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र :

,
भुसावळ -नुकताच मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने, मध्यप्रदेशामध्ये मुख्यमंत्री सिखो कमाओ योजनेस नुकतीच मंत्रिमंडळात मंजुरी दिली . यांचा एकमेव उद्देश आहे की राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्यासाठी पात्र बनविणे. या योजनेअंतर्गत १८ ते २९ वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग देण्यात येणार असून ट्रेनिंगच्या दरम्यान युवकांना स्टा य पेंड सुद्धा देण्यात येणार आहे. या ट्रेनिंग नंतर युवकांना नोकरीची संधी प्लेसमेंट सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. 700विविध प्रकारचें स्कील ची काम यात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मध्ये इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स ,मेकॅनिकल सिव्हिल, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट ,टुरिझम अँड ट्रॅव्हल रेल्वे ,आयटीआय ,सॉफ्टवेअर बँकिंग ,बीमा ,लेखा चार्ट यासह अनेक विविध क्षेत्रातील स्किलचे कामांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. त्यामुळें मध्य प्रदेशातील बेरोजगार युवकांना त्यांच्या कौशल्यावर आधारित विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे आणि हे कौशल्य शिक्षण घेत असताना या योजनेअंतर्गत जे युवक12वी पास आहेत त्यांनाप्रति महीना ८००० हजार रुपये , जे आयटीआय उत्तीर्ण आहेत त्यांना ८५०० महिना, जे युवक डिप्लोमा पास आहेत त्यांना 9 हजार रुपये महिना, आणि यापेक्षा उच्च शिक्षित, पदवी धारकांना १० हजार रुपये महिना स्टायपेंड देण्यात येणार आहे . तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मध्यप्रदेश सरकारच्या कौशल्य विकास आणि रोजगार निर्माण बोर्डाच्या माध्यमातून एससीव्हीटी सर्टिफिकेशन देण्यात येणार आहे .आणि त्यामुळे त्यांना नियमित रोजगार सुद्धा मिळणार आहेत ,हेच नव्हे तर विविध कंपनीच्या प्लेसमेंटसुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्यात येणारं आहेत.
म्हणून मध्यप्रदेश सरकारच्या या योजनेसारखीच योजना महाराष्ट्र राज्यात सुद्धा राबवावी , अथवा महाराष्ट्रातील 18 ते 40 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपण बेरोजगार भत्ता त्वरित सुरू करावा अशा आशयाचे विनंती पत्र सामाजिक कार्यकर्ते , शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठविले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळविलेले आहे .