मनवेल- कोळी समाज विकास मंच मार्फत १४ मे रोजी रविवारी पाचव्या सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आ.रमेश पाटील यांचा अध्यक्षतेखाली सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून माजी मंत्री दशरथजी भांडे यांच्या हस्ते आद्यकवी महर्षि वाल्मिक पुजन करण्यात येणार आहे.
गणेश पुजन दिपनगरचे पँनल प्रमुख रामचंद्र तायडे यांचा हस्ते करणात येणार आहे
या सोहळ्याचे दिपप्रज्वलन ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, ,पालकमत्री गुलाबराव पाटील खा.रक्षा खडसे,आ.शिरीष चौधरी ,आ.सांजय सावकारे,आ.राजूमामा भोळे आ.एकनाथ खडसे,आ,चद्रकांत पाटील श्रीमती लिलाबाई सोनवणे यांचा हस्ते करण्यात येणार आहे तर उटघाटन म्हणून आ.लताताई सोनवणे
शिवसेना उपनेते शरद कोळी ,आ.शिरीष चौधरी,मा.समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे ,सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी डाँ शांताराम सोनवणे ,परेशभाई कोळी,जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे ,वाल्मिकराजचे संपादक अजय कोळी ,मा.आ.संतोष चौधरी,जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांचा हस्ते करण्यात येत आहे.
पिंप्री फाटा दिपनगर येथे १ वाजून ३५ मि.सामुहीक विवाह सोहळ्यात दहा वधु -वरांचे लग्न लागणार असून कोळी समाज विकास मंच आयोजित करण्यात आलेल्या सामुहीक विवाह सोहळ्याची जैय्यत तयारी आयोजक करीत आहे.
या सोहळ्याचे यशस्वी करीता मुख्य आयोजक नारायण कोळी साकरी ,समीतीचे अध्यक्ष अनिल तायडे ,उपाध्यक्ष कीशोर सपकाळे ,सचिव गजानन तायडे ,सहसचिव मोहन कोळी ,लक्ष्मण कोळी,गणेश तायडे ,दिपक पाटील ,संजय तायडे ,रामचंद्र तायडे ,देविदास कोळी व समाज बांधव परीश्रम घेत आहे.
उपस्थितीचे आवाहन कोळी समाज विकास मंच आयोजित पदाधिकारी व समस्त कोळी समाज बांधवांनी केले आहे.



