मणिपूरात अडकलेल्या भुसावळच्या तरुणाची सुखरूप सुटका :

भुसावळ : मणिपूरात उफाळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत 54 नागरीकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच भारतातील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा मुद्दा समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. महाराष्ट्र सरकारच्या मदतीमुळे मणिपूरमध्ये अडकलेले सर्व 25 विद्यार्थी मणिपूरमधून सुखरुप बाहेर पडले असून सध्या हे विद्यार्थी शासनाच्या मदतीने विमानाने दाखल झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये भुसावळातील फाल्गुन किरण महाजन याचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातुन एकटास्पोर्टमध्ये भुसावळ मधिल फाल्गुन किरण महाजन निवड झाली होती. हा मणिपूर इन्फाल येथील स्वागत नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मध्ये आहे. त्याने वडिलांना फोन केला बाबा मणिपूरमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे तरी तुम्ही मला भुसावळला येण्यासाठी काहीतरी सुविधा करा. वडिलांनी लगेचच आमदार संजय सावकारे यांना फोन केला. आमदार संजय सावकारे बोलले फाल्गुन ची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी ताबडतोब कलेक्टरला ते सेंड केली नंतर संजय सावकारे यांनी मंत्रालयात त्याची माहिती दिली. संजय सावकारे यांनी मुलाला आणण्याची लाईन मंत्रालयातून लावली. तसेच इम्फाल हून गुहाटीला वाजेला 2 एअरलाइन्सने मुंबईला संध्याकाळी 7.30 वाजेला ए्अ्रपोर्टला तो पोहोचला. तेथे त्याचं जंगी स्वागत झालं जेवण रेल्वे एसी रिझर्व्हने सकाळी तो भुसावळला सुखरूप पोहोचला.