भुसावळात चतुर्विध संघाचा तीन दिवसीय धार्मिक सोहळा उत्साहात

भुसावळ- येथील जैन चातुर्मास समिती आयोजित अक्षय तृतीया निमित्ताने तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याचे आयोजन पंचायती भवनात करण्यात आले होते. पहिल्या दिवशी बारा भावनांचा जप व पोरशी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी बयासना दिवस व नमोत्थुणंचा जाप करण्यात आला. तिसऱ्या दिवशी
एकासना दिवस व नमो जीणांण जिय भयाणं चि जाप करण्यात आला. विशेष म्हणजे या तीनही दिवशी प्रत्येक जैन श्रावक आणि श्राविकेने तीन सामायिक करून हे तीन दिवस धार्मिक रीतीने व तसेच सुश्राव्य व्याख्यान अशा रीतीने पार पडले .या प्रसंगी पु. प्रदीपमुनीजी म.सा. पू. कपिल मुनीजी म.सा. आदी ठाणा २, साध्वी पू. रुचीताजी म.सा.आदी ठाणा४ यांच्या सानिंध्यात ओसवाल पंचायती भवनमध्ये हा धार्मिक उत्सव साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे संचलन जैन कॉन्फरन्सचे ज्ञान प्रकाश योजनेचे अध्यक्ष व जैन विचारवंत प्रेमभाऊ कोटेचा व सुनील कोटेचा यांनी केले.

त्याचप्रमाणे या वर्षभरात सातत्याने तपस्या करणाऱ्या सौ.शोभा ललवाणी ,सौ.सपना नाहटा,सौ शोभा डेलीवाल, सौ. ज्योती ललवाणी, व चंदन कोटेचा यांचा सौ. विमलाबाई कोटेचा, सौ. मंगलाबाई कोटेचा, सौ. वर्षा कोटेचा, सौ .संगीता मुगदिया यांच्या हस्ते नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ श्रावक, जैन धर्माचा सखोल अभ्यास असणारे, व तसेच सर्व महाराष्ट्रात जैन समाजाचा आधारस्तंभ म्हणून गणले गेलेले,प्रेमभाउ कोटेचा यांनी अक्षय तृतीया का साजरी करावी? या मागचे इतिहास कालीन दाखले काय ?जैन धर्मामध्ये याचा कोणत्या प्रकारे परमर्श घेतला गेलेला आहे ? त्याचप्रमाणे याचे महत्त्व काय? हे सविस्तरपणे वर्णन करून सर्व साधकांच्या मनाला भुरळ घालून एक नवीन विचारांना उजाळा देण्यात आला.सौ.लता सिसोदिया,डाॅ.संजय गादिया,
नलीन ललवाणी ,जयेश नाहार,विराज डेलीवाल यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शहरातील मोठ्या संख्येने श्रावक व श्राविका उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये चातुर्मास समितीचे अध्यक्ष ,टॅक्स कन्सलटंट प्रशांत कोटेचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा त्रिदिवसीय धार्मिक सोहळा यशस्वीरीतीने पार पाडला. प्रशांत कोटेचा यांनी समाजातील सर्वांचे आभार व्यक्त करून, भविष्यात सुद्धा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घ्यावा असे नम्र आवाहन केले आहे.