भुसावळअष्टभुजा देवी यात्रा;बारा गाड्या उत्साहात संपन्न :

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिर यात्रे निमित्त आज बारा गाड्या ओढण्यात आल्या चैत्र शुद्ध.चतुर्दशी च्या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा पिढ्यांनी पिढ्या पासून सुरु आहे या पार्श्वभूमीवर यंदा जामनेर रोडवरील शनि मंदिरा पासून ते अष्टभुजा देवी मंदिरा पर्यंत बारा गाड्या ओढल्या जात असतात . यंदा भगत हरीष अनिल लोखंडे यांनी बारा गाड्या ओढल्या असून त्यांचे बगले निलेश पाटील विनायक झोपे हे होते.यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.