भुसावळ – बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे ४ एप्रिल रोजी वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, स्मिताजी बियाणी तसेच भुसावळ नगर परिषदेचे माजी नगरसेवक बापू महाजन, दीपक धांडे तथा विशेष अतिथी म्हणून राजू पारिख, प्रवीण भराडीया, बियाणी स्कूलचे प्राचार्य रुद्रसेन गंठिया इत्यादी उपस्थित होते.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक,सांस्कृतिक व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज बियाणी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरील आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विशेष प्राविण्यबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक आर के तायडे तर आभार प्रदर्शन प्राचार्य डी एम पाटील यांनी केले.



