आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील मुलींचे कन्यादान : जेसीआय भुसावळ ताप्तीचां स्तुत्य उपक्रम :



भुसावळ – जेसीआय भुसावळ ताप्तीने शहरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील मुलींचे कन्यादान करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविला . या उपक्रमामुळे वधू परिवारासह उपस्थितांचे मन भारावले त्यांनी जेसीआय भुसावळ ताप्तीचे भरभरून कौतुक करीत क्लबसदस्याना आशिर्वाद दिले .
कन्यादानमं महत पुण्यंम ..हिन्दू संस्कृतीत कन्यादानाचे अत्यंत महत्व असून मुलीच्या लग्नात आई वडिल वा आप्तइष्ट मुलीचे
कन्यादान करतात. मात्र प्रचंड वाढती महागाई हुंडा पद्धती परंपरा , रूढी ,चालिरिती लक्षात घेता आजही अनेक गरीब कुटुंबातील मुलींचे विवाहास अडचणी येतात हे मार्मिक सत्य शहरातील जेसीआयने हेरले असून त्यांनी सर्व सदस्यांचे सहकार्याने शहरातील काही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबातील मुलींचे
कन्यादान करण्याचे स्तुत्य पाउल उचलले . व त्या अनुषंघाने जेसीआय भुसावळ ताप्ती तर्फे प्रकल्प प्रमुख वर्षा जैन,हेमा बेहरा,पल्लवी
झोपे,मोनिका अग्रवाल,संगीता अग्रवाल यांनी उत्कृष्ट कार्य केले .
प्रसंगी कन्यादानास मुलींना अध्यक्ष सौ रजनी सावकारे , सचिव जयश्री अग्रवाल प्रकल्प प्रमुख वर्षा जैन,हेमा बेहरा,पल्लवी
झोपे,मोनिका अग्रवाल, यांनी सहसन्मानपूर्वक कार्यक्रमस्थळी आणले यावेळी मंत्रोच्चाराचे जयघोषात जगदीश शर्मा गुरुजी यांनी विधीपूर्वक पूजाविधि केला तसेच मुलींचे औक्षण करण्यात येवून कन्यादानाचा सोहळा संपन्न झाला .
कन्यादान प्रित्यर्थ क्लब मधील सर्व सदस्यांनी व मित्रपरिवारांनी आपापल्यापरीने मुलींना भेट स्वरूपात संसारउपयोगी वस्तू दिल्या. यामध्ये सौभाग्याचे प्रतीक असलेले मणीमंगळसूत्र (वाट्या), मनी,जोडवे,तोरड्या आदी वस्तू देण्यात येवून उत्साहात कन्यादान सोहळा झाला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संगीता बियाणी होत्या. तसेच
दीपा पटेल,ज्योति दरगड,सोनल झंवर,राधा झंवर,आभा दरगड,सुनीता जैन,सुनीता दरगड,स्मिता बियाणी,इशा मनवानी, अभिलाषा गुप्ता,गीतिका दरगड,सोना मोटवानी,रिया छबरा,पिया छबरा,रेखा व्यास,नीलम जैन,कृष्णा,सुचित्रा अग्रवाल,अर्चना अहुजा आदी प्रतिष्ठित उपस्थित होते .
यशस्वितेसाठी प्रकल्प प्रमुख वर्षा जैन,हेमा बेहरा,पल्लवी
झोपे,मोनिका अग्रवाल,संगीता अग्रवाल यांनी उत्कृष्ट कार्य करीत हा प्रकल्प पार पाडण्यास सहकार्य केले.