*
भुसावळ –
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शन मिळाल्याने आणि चेकिग स्टाफ च्या प्रयासाने भुसावळ विभागाचे 4 टिकीट चेकिग् स्टाफ भुसावळ या आर्थिक वर्षात 2022-23 रेलवे ला टिकीट चेकिंग च्या माध्यमातून करोड रुपये कमवून दिले

खालील 4 TTE ने तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून प्रत्येकी 1 कोटी पेक्षा जास्त दंड वसूल करण्याचे उत्कृष्ट काम केले आहे-
1) के.के. पटेल–
एकट्याने 1,23,80,290/- दंड वसूल केला, जो भुसावळ विभागात एका TTE द्वारे सर्वाधिक आहे.
त्याने एकूण 14,466 तिकीट नसलेल्या प्रवाशांना दंड ठोठावला.
2) विनय ओझा-
यांनी 1,22,21,050/- दंडित रक्कम वसूल केले
एकूण 15,728 बिना तिकीट प्रवाशांना पकडले आणि दंड वसुल केला
3) गुड्डू कुमार-
यांनी 1,02,15,810/- दंड वसूल केला,
13,126 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून.
4) आर.के. गुप्ता-
यांनी 1,01,29,205/- दंड वसूल केला,
12,252 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून.
वरील सर्वोच्च कामगिरी करणार्या 4 टिकीट चेकिंग स्टाफ ने एकूण 4.49 करोड
55,572 तिकीट नसलेल्या प्रवाशां कडून दंड वसूल करुन भुसावळ विभागाला उत्पन्न मिळवुंन दिले.
अशी कामगिरी बघून भुसावळ विभागाची मंडळ रेल प्रबंधक श्री एस एस केडीया यांनी 4ही टिकीट चेकिंग स्टाफचे कौतुक केले आणि पुढेही असेच कार्य सर्व टिकीट चेकिंग स्टाफ ने कार्य करावे असे म्हटले
प्रवाशांना विनंती आहे की, योग्य तिकीट काढून योग्य वर्गाच्या डब्यातच प्रवास करावा, जर तुम्हाला तिकिटासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगेपासून स्वतःला वाचवायचे असेल तर रेल्वेचे UTS ॲप डाउनलोड करून वापर करा.



