भुसावळ – येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत, भुसावळ कला विज्ञान आणि पु, ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ हे परीसरातील एक अग्रगण्य महाविद्यालय असुन यांची गेल्या तीन वर्षांपासून NAAC च्या चौथ्या Cycle ची तयारी सुरु होती यात 7 क्रायटेरीया असुन त्यांची तयारी पूर्ण करुन महाविद्यालयाने आक्टोबर 2022 मध्ये सेल्फ स्टडी रिपोर्ट नॅक (Self Study Report NAAC) कडे सादर केला त्या अनुशंगाने महाविद्यालयाला दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी नॅक पीअर टीम बेंगलोर ( NAAC Peer Team Banglore) ने भेट दिली त्यात अध्यक्ष डॉ. राज सिंग, कुलगुरु जैन विद्यापीठ बंगलोर, डॉ. शालिनी सिंग, प्राध्यापक एम डी यु रोहतक आणि डॉ. रविंद्र कुमार प्राचार्य, गोंडा महाविद्यालय उत्तर प्रदेश यांनी भेट दिली भेटी दरम्यान त्यांनी महाविद्यालयात प्राचार्य यांचेशी संवाद साधला व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, IQAC, या विभागांना भेटी देऊन मुल्यमापन केले त्यानंतर माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी यांच्या स्वतंत्रा सभा घेतल्या व महाविद्यालयाविषयी त्यांचेशी हितगुज केले त्यानंतर महाविद्यालयातील, फीजीक्स, केमेस्ट्री, संगणकशास्त्र, बॉटनी, झूलॉजी, गणित, भुगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मराठी, हिंदी, इंग्रजी, आणि वाणिज्य या सर्व विभगाना प्रत्यक्ष भेटी देऊन कागदपत्रांची पडताळणी केली त्यानंतर कार्यालयात व ग्रंथालयात भेट देऊन कामकाजाचे परिक्षण केले, त्यानंतर एन एस एस, एन सी सी, स्पोर्स्ट, सांस्कृतीक कार्यक्रम जिमखाना इ. विभागांना स्वतंत्र भेटी दिल्या चालता बोलता विद्यार्थ्याशी संवाद साधला.

एकंदरीत दोन दिवस परिक्षण करुन Exit मिटींग मध्ये गोपनीय अहवाल प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांचे कडे सुपुर्द केला. दि. 14 फेब्रुवारी 2023 रोजी नॅक कडून महाविद्यालयास मुल्यमापन रिपोर्ट प्राप्त झाला त्यान नविन Frame Work प्रमाणे कवियत्री वहिणाबाई चौधरी उमवी जळगांवच्या परिसरात पहिल्यांदा चौथ्या Cycle साठी महाविद्यालयाने आपली ‘A’ Grade कायम ठेवला त्या बद्दल परिसरातील सर्वाना अभिनंदाचे मेसेज प्राप्त होत आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहनभाऊ फालक, चेअरमन श्री महेश भाऊ फालक, सचिव श्री विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष श्री संजयजी नाहाटा व सर्व व्यवस्थपन मंडळाचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, माजी प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य व IQAC चे प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उप प्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.एन ई भंगाळे व कार्यालय प्रमुख श्री भगवान तायडे व सर्व Criterion प्रमुख, DVV प्रमुख, Steering समिती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


