भुसावळ – आगामी काळात येणारे सण उत्सव तसेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात जातीय सलोखा व शांतता कायम टिकून राहावी कोणताही अनुचित प्रकार घडु नये. शहर व परिसरातील गुन्हे व गुन्हागार यांचेवर वचक बसावा याकरिता भुसावळ शहरातील मुख्य मार्गावरून पोलीसांनी रुट मार्च केले.
शहरातील मिरवणूक मार्गासह संवेदनशील भाग ,महत्त्वाचे ठिकाण व संमिश्र वस्तीतून पोलिसांनी रूट मार्च केले .
अधिकाऱ्यांना शहरातील संवेदनशील पाॅकेटसची माहिती व्हावी . जेणेकरून भविष्यात काही अनुसूचित प्रकार घडला तर पोलीस दलाला मदत करणे सोपे होईल त्यादृष्टीने सदर रूट मार्च
केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे.
या पथकात सीआरपीएफची रॅपिड अँक्शन फोर्स, पोलीस मुख्यालयाकडून आलेले तीन आरसीपी प्लाटून , शहर पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखा, बाजारपेठ पोलीस कर्मचारी यांनी रुट मार्च केला. यामध्ये पाच अधिकारी 65 कर्मचारी यांचा समावेश होता
अधिकाऱ्यांना शहरातील संवेदनशील पाॅकेटसची माहिती व्हावी . जेणेकरून भविष्यात काही अनुसूचित प्रकार घडला तर पोलीस दलाला मदत करणे सोपे होईल त्यादृष्टीने रूट मार्च करण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगीतले

दरम्यान लक्ष्मी चौक येथे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच रेपिड आल्यावर सर्वांचे राजस्थानी विप्र नवयुवक मंडळातर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी राजस्थानी विप्र नवयुवक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार शर्मा, उद्योगपती राधेश्याम लाहौटी ,जे. बी. कोटेचा ,मोहन भराडिया , उमाकांत शर्मा (नमा),अँड. गोकुल अग्रवाल, जगदीश अग्रवाल, सुनील ठाकुर आदि मान्यवर उपस्थित होते .


