भुसावळ – नेवे वाणी समाजाचे स्नेह सम्मेलन भुसावळात नुकतेच मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित स्नेह सम्मेलनात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उच्च न्यायालयाचे अँड.प्रकाश साळशिंगीकर – मुंबई, तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती तपस्या नेवे – मुंबई, राहुल गायकवाड – पीआय बाजारपेठ पोलिस स्टेशन भुसावळ व .संदीप चिद्रावार – मुख्याधिकारी न.पा भुसावळ उपस्थित होते.

या वेळी व्यासपीठावर समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक मा.रमेश विश्वनाथ नेवे, श्रीमती सिंधुताई वाणी, श्रीमती सुमनताई नेवे, मा.चंद्रकांत बळीराम वाणी, मा.सुधीर (दादा) दत्तात्रय नेवे तसेच प्रा.सुनील नेवे हे उपस्थित होते. प्रस्तावित – प्रशांत नेवे यांनी तर सूत्रसंचालन सौ.मनीषा
वाणी, सौ.अंजली नेवे, सौ विनीता नेवे, कु.साक्षी नेवे तर आभार प्रदर्शन किरण बाळकृष्ण वाणी यांनी केले.
सकाळी ९.०० वाजेपासून ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमात सोलो डान्स, वेशभूषा स्पर्धा, कपल डान्स, फ्लॉवर बुके डेकोरेशन, पूजेची थाली डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आल्या. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आयोजित स्पर्धेत अनेकांनी उत्स्पुर्थ सहभाग नोंदविला. घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व त्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक
स्पर्धकांना देण्यात आले. दुपारच्या सत्रात समाजातील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ई.पहिली पासून इंजिनियरिंग पर्यंत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थांच्या सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक सम्माननीयअतिथींच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रात समाजाचे नाव उज्वल करणार्या समाज बांधवांचा देखील प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सकाळपासून सायंकाळापर्यंत शहर व परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविली. समाज बांधवांनी आनंदाने स्नेह सम्मेलन साजरे केले. आजच्या धावपळीच्या युगात समाजातील बांधवांनी एकमेकांची ओळख व परिचय व्हावा, सर्वांनी सहकुटुंब एकत्र
यावे, समाज मंथन व विचार मिनिमय व्हावा या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच काळाच्या ओघात नष्ट होणारी नेवे वाणी समाजाची बोली भाषा सर्वांना अवगत व्हावी, भाषा जीवंत राहावी, यासाठी विशेष प्रयत्न करावे असे मत समाज मंथनातून व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी बोली भाषेचे प्रात्यक्षिक रमेश नेवे व चंद्रकांत वाणी यांनी मंचावर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आयोजन समाजातील तरुण वर्गाने करून मोठा उत्साह
साजरा केला.
नेवे – वाणी समाज अध्यक्ष पदी – श्री किशोर नेवे
नेवे – वाणी समाज महिला मंडळ अध्यक्ष पदी – सौ विनीता नेवे
येथील नेवे वाणी समाजाच्या मेळाव्यात नेवे वाणी समाज अध्यक्ष पदी श्री किशोर गजानन नेवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी श्री दीपक हरिभाऊ नेवे तर सचिव म्हणून श्री राम माहुरकर यांची निवड करण्यात आली. महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ विनीता सुनील नेवे, उपाध्यक्ष पदी सौ अंजली प्रशांत नेवे तर सचिव पदी सौ\पूजा उदय नेवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


