भुसावळात जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धेचे आयोजन : महिलांसाठी खुले व्यासपीठ :

भुसावळ – महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा , त्यांना सक्षम व्यासपीठ मिळावे याकरीता येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे “स्त्रियांमधील अंधश्रद्धा ” या विषयावर निबंध व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी अटी निबंध हा सुवाच्य अक्षरात, कागदाच्या एकाच बाजूला लिहावा, निबंधाची शब्दमर्यादा 300 शब्द राहील. आपले पूर्ण नाव, पत्ता, आणि कॉन्टॅक्ट नंबर वेगळ्या कागदावर लिहून पाठवावा. सदर स्पर्धेत १८ वर्षांवरील सर्व मुली आणि महिला सहभागी होऊ शकतात. निबंध स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट तीन आणि काव्य स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
बक्षीस समारंभ कार्यक्रम ११ मार्च 2023 रोजी दुपारी 1 वाजता
सौं. गायत्री विनोद विसपुते
निधी हाइट्स गणेश विहार गणेश कॉलनी रिंग रोड भुसावळ येथे संपन्न होईल.
निबंध व कविता पाठविण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी असून ही स्पर्धा केवळ जळगाव जिल्ह्यासाठी मर्यादित आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहिल.
निबंध व कविता ( पोस्टाने किंवा स्वत. ) पाठविण्याचे ठिकाण –
निबंध पुढील पत्या वर पाठवावा, अर्पण हॉस्पिटल,
कोर्टाचा मागे भुसावळ
जि. जळगाव पिन 425201, शिवम् फॅन्सी ड्रेसेस.
व्ही. एम. वार्ड भुसावळ , शैला सावंत , झुळूक साई चौक ,
माऊलीं नगर, विकास कॉलनी,
जामनेर रोड , भुसावळ भ्रमणध्वनी 8805963083
9423509221
9673104919 यावर संपर्क साधावा . तरी जास्तीत जास्त महिलांनीं स्पर्धेत सहभागी होवून महिला दिन साजरा करावा असे आवाहन आयोजक सक्षम नारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे .