जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील व्यक्ती गणनेसाठी विशेष प्रशिक्षण

जळगाव (प्रतिनिधी)- जनगणना संचालनालय, महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ च्या दुस्या टप्प्यातील व्यक्ती गणनेच्या प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले. या प्रशिक्षणाअंतर्गत जनगणना संचालनालय, मुंबई येथील सुनील आत्राम (एडीसीओ) आणि मयूर पवार (एसआयजी-२) यांनी व्यक्ती गणना (पॉप्युलेशन एन्युमरेशन) टप्प्यातील कार्यपद्धती, तांत्रिक प्लॅटफॉर्म आणि क्षेत्रीय प्रक्रियांबाबत प्रशिक्षण दिले. तसेच जनगणनेच्या प्रक्रियेतील सर्व टप्प्यांची सविस्तर माहिती यावेळी दिली. व्यक्ती गणना करताना कशाप्रकारे माहिती नोंदवावी, प्रगनकांनी व पर्यवेक्षकांनी जनगणना करताना काय दक्षता घ्यावी काय करावे काय करू नये, याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणास सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिका अधिकारी व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी, महसूल सहायक अधिकारी, तांत्रिक सहायक, चार्ज अधिकारी यांचे लिपिक तसेच जनगणना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.