भुसावळातील घरफोडी प्रकरणी जामनेरातील तीन आरोपी जेरबंद : बाजारपेठ पोलिसांची कामगीरी :

भुसावळ – शहरातील तुकाराम नगर भागात गेल्या पंधरवाड्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी जामनेर येथील तीन आरोपींना जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत .

बाजारपेठ पो.स्टे सीसीटीएनएस गुरन १९/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८०
प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असुन सदर गुन्ह्यात फिर्यादी धनश्री प्रमोद भारंबे ( रा. तुकाराम नगर भुसावळ ) यांचे घरी दिनांक ५ ते ७ /०१/२०२३ दरम्यान
कोणत्यातरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एकुण ५०,५००/- रूपये कि. चे सोन्या- चांदीचे दागिने
व रोख रूपये असे घरफोडी करून चोरी केली होती.
या गुन्हयाच्या तपासात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अमंलदार पोहेका विजय
नेरकर, पोना निलेश चौधरी, पोना उमाकांत पाटील, पोकॉ
प्रशांत परदेशी व पोकॉ योगेश माळी यांनी सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेत तांत्रीक विश्लेषण करुन अज्ञात आरोपी निष्पन्न केले गुन्हयातील आरोपी पुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हददीत आल्याची गोपिनीय माहीती पोना
उमाकांत पन्नालाल पाटील, पोकॉ प्रशांत रमेश परदेशी, पोकॉ योगेश नामदेव यांना मिळाली यानुसार बाजारपेठ पोस्टेच्या गुन्हे शोध पथकाने यातील
संशयीत आरोपी शेख ईरफान उर्फ हशरद शेख रउफ वय-२४ रा. टिपू सुलतान चौक जामनेर , फातेर शेख उर्फ गोल्या तुफेल मोहम्मद शेख वय १८ रा. ईस्लामपुरा जामनेर यांना भुसावळ शहरातुन व आरोपी क्रमांक ०३) शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर वय २१ रा. मदिना नगर जामनेर यांना ताब्यात घेतले त्यांची कसून विचारपुस केली असता त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीत तिन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असुन या तीन्ही आरोपीच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेल हत्यार व वाहने तसेच मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहे. तसेच सदर आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असतांना त्यांच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल यात बाजारपेठ पो.स्टे. गुरन १९/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८० मध्ये चोरीस गेलेल्या
मुद्देमाला पैकी ५ ग्रम वजनाची एक सोन्याची अंगठी व चांदीच्या पायातील पैंजण व २४२५/-रु. रोख. गुरन २९/२०२३ भादवि कलम ४५४,४५७,३८० मध्ये चोरीस गेलेल्या
मुद्देमाला पैकी ५.५ ग्रम वजनाची सोन्याची पोत मधील पैन्डल व सोन्याचे मणी , हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच
गुरन ३२/२०२३ भादवि कलम ४५७,३८० सदर गुन्हा केल्याची कबुली
दिली आहे तर चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे.
यांनी केली कारवाई
वरील गुन्हे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार , अप्पर पोलीस अधिक्षक
चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे पोलीस
निरीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका विजय नेरकर, पोना निलेश चौधरी, पोना उमाकांत पाटील, पोकॉ
प्रशांत परदेशी, पोकॉ योगेळ माळी, पोकॉ सचिन चौधरी, पोकॉ अतुल कुमावत,
पोकॉ सागर वंजारी, पोकॉ भरत बाविस्कर, पोकॉ जावेद शहा, पोना तुषार पाटील, पोकॉ सचिन पोळ अंशानी कारवाई केली आहे.
याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.