भुसावळ रेल्वे स्थानकावर अत्यावश्यक वैद्यकीय कक्ष स्थापन :


भुसावळ – विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.एस.केडिया यांनी भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील नवीन अत्यावश्यक वैद्यकीय कक्षाची पाहणी केली. हा कक्ष भुसावळ विभागातिल पहिला वैद्यकीय कक्ष आहे
या खोलीचा मूळ उद्देश

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवासा दरम्यान प्रवाशांच्या आरोग्यविषयक समस्या आणि इतर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी भुसावळ स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्षाचे (ईएमआर) कंत्राट दिले आहे.. एक्सेल पॉलीक्लिनिक आणि हॉस्पिटल भुसावळला प्रवाशांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी रु. 10,11,000/- वार्षिक दराने खुल्या निविदाद्वारे सुविधा प्रदान केली जाते.
तसेच रेल्वेसाठी महसूलाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे.

. ही सुविधा २४x७ चोवीस तास उपलब्ध असेल.विभागातील नाशिकरोड, अकोला आणि जळगाव यांसारख्या इतर स्थानकांवरही अशाच सुविधा पुरविल्या जातात ज्यामुळे त्याची व्याप्ती वाढावी आणि जास्तीत जास्त प्रवाशांना सेवा मिळावी.
निरीक्षण करताना भुसावल विभागाचे मुख्य चिकित्सा अधिकारी संजीव एन के, वरिष्ठ मुख्य वाणिज्य प्रबंधक शिवराज मानपुरे, वरिष्ठ विभागीय मुख्य अभियंता (सामान्य) तरुण दंडोतिया, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटासिंग व इतर अधिकारी उपस्थित होते.