भुसावळ – विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनीं बुधवार, दिनांक 18.1.2023 रोजी संध्याकाळी ४:३० वाजता खडका ते कन्हाळे रोडवरील शेत शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भोळे यांच्या शेतात बैठकीचे आयोजन केले आहे.
तालुक्यातील सर्व विधानसभा क्षेत्र संघटक, तालुका संघटक, तालुका समन्वयक, उपतालुकाप्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शहर संघटक, शहर समन्वयक, शाखाप्रमुख, शिवसैनिक, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या अंगीकृत संघटना युवासेना, महिला आघाडी, रेलकामगार सेना, शिक्षक सेना, एसटी कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अल्प संख्यांक आघाडी व इतर सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहायचे आहे. बैठकीमध्ये माजी आमदार माननीय दिलीप भोळे व शिवसेना जिल्हाप्रमुख मा. समाधान महाजन, रावेर लोकसभा सहसमन्वयक प्रा . उत्तम सुरवाडे, तालुका प्रमुख संतोष सोनवणे हे मार्गदर्शन करणार असून सदर कार्यक्रमास आपले उपस्थिती प्रार्थनीय आहे. तरी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख संतोष माळी, दीपक धांडे, हेमंत खंबायत यांनी केले आहे.



