विश्वनाथ भिका महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन :


भुसावळ । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील मूळ रहिवासी आणि हल्ली नाहाटा कॉलेजमागील गायत्री नगर मध्ये वास्तव्यास असलेले निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ भिका महाजन (वय ९१) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (दि.१३) सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,सून,एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अरुण महाजन यांचे ते वडील होत.