वीज कर्मचाऱ्यांचा ७२तासांचा संप अटळ

भुसावळ – महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व तीस संघटना यांनी पुकारलेल्या दिनांक ४ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ या तीन दिवसीय संपाबाबत मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व मा.ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांना अग्रेषित केलेल्या महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती खाजगीकरण धोरण व इतर मुद्दे या विरोधात क्रमबद्ध आंदोलनाबाबत दिलेल्या पत्रानुसार तसेच महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील संघर्ष समितीतील सहभागी तीस संघटना दिनांक ४ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ रोजी तीन दिवसांच्या संपात सहभागी होत आहेत; तरी ४ जानेवारी रोजी ७२ तासांच्या संप काळापासून सुरू होत असलेल्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी क पातळीतील कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांना उपरोक्त पर्यायी व्यवस्था करून कार्यमुक्त करून सहकार्य करण्याची मागणी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आंदोलन दरम्यान आंदोलन कर्ते शांतता मार्गाने संप करणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.