गजानन महाराज पायी दिंडी पालखी रवाना :


भुसावळ – शहरातील जय गजानन गृपतर्फे भुसावळ ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यानुसार स. ८ वा. अष्टभुजा देवी मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर येथून पायी दिंडी रवाना झाली. पायी दिंडी सोहळ्याकरिता गिरीष बडगुजर, उमाकांत चौधरी, मुकेश पाटील, रवी वर्मा यांनी परिश्रम घेतले. ही दिंडी शहरातून जवाहर डेअरीमार्गे मरिमाता मंदिर, सराफ बाजार, स्टेशनरोड, वरणगाव रोडहून मुक्ताईनगरकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान ठिकठिकाणी गजानन महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. या दिंडी सोहळ्याचा गजानन महाराज भक्तांनी आनंद घेतला.

या दिंडीचा मुक्काम मुक्ताईमंदिर, मुक्ताईनगर, रामवाडी, राममंदिर, मलकापूर, नांदुरा येथे होणार असून, शेगाव येथे ७ जानेवारी रोजी पायी दिंडी पोहचणार आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक परिक्षीत बर्‍हाटे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच यावेळी तेजोदिप फाऊंडेशनचे कार्यकारिणी सचिव वसंत कोलते, सदस्य किरण पाटील, माजी शिवसेना शहराध्यक्ष बबलू बर्‍हाटे, मधुकर पाटील, सागर वाणी, शिरीष बडगुजर, विशाल वानखेडे, यशवंत वारुळकर, उत्तम निकम, कार्थिक नाथकर, जोशा महाराज, बंडु चौधरी, सुभाष ठाकुर, नितीन चौधरी, विशाल बोरोले, आनंदा हरी बर्‍हाटे, गोकुळ पाटील, अतुल पाटील, रवींद्र बोरोले, महेश पुंडलिक पाटील, अनंत वाटपाडे, राजेश महाजन, मिलिंद भंगाळे, सुनिता बडगुजर, रोटरी क्लबच्या मनिषा महेश पाटील, कविता बडगुजर, नूतन हिरामण फालक, राहुल पाटील, बापू भारंबे आदींसह मान्यवर तसेच दोनशेपेक्षा जास्त गजानन महाराज भक्तगण उपस्थित होते.