क्रांतीज्योती सावित्रीबाई प्रतिष्ठा महिला मंडळ व जेसीआय भुसावळ ताप्ती तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी :

भुसावळ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या जयंतीनिमित्त येथील प्रतिष्ठा महिला मंडळ व जेसीआय भुसावळ ताप्ती तर्फे आजच्या काळाची महत्वपूर्ण गरज असलेला विषय म्हणजे सायबर जागरूकता व सतर्कता या विषयावर सुप्रसिद्ध सायबर सुरक्षा तज्ञ तूषार राजू परदेशी यांनीं महत्वपूर्ण व्याख्यान सादर केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे यांनी वाढत चाललेल्या सायबर क्राईम वर आपले मतदार संघातील व्यक्ती चे अनुभव सांगितले व अतिशय साध्या व सोप्प्या पध्द्तीने मार्गदर्शन केले.वाढत चाललेल्या सायबर क्राईम पासून संरक्षण करिता असे व्याख्यानच्या माध्यमातून जनजागृती करणे व समाजाला जागृत करणे ही आज काळातील गरज असल्याचे आमदार यांनी सांगितले व मंडळाचे कौतुकही केले. स्मार्ट फोनचा वापर आपण किती स्मार्टली करायचा हे त्यांनी आवर्जून सांगितले.
सुप्रसिद्ध सायबर सुरक्षा तज्ञ
तुषार राजू परदेशी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले.
ज्यांनी आता पर्यंत 100 च्या वर सेमिनार घेऊन लोकांना सायबर क्राईम वर आपले विचार व्यक्त करून व प्रात्याक्षिके दाखवून लोकांमध्ये सायबर क्राईम पासून कसे सावध राहावे या साठी मार्गदर्शन केले आहे.ऑनलाइन आर्थिक व्यवहार करतांना, फेसबुक वोट्स अप, ट्विटर,स्नॅपचेट, इन्स्टाग्राम सारख्या डिजिटल मीडिया वापरताना व कुठले ही अनोळखी मेसेज वर रिप्लाय करतांना काय काळजी घ्यावी हे सांगितले. इमेल आई डी चा दुरुपयोग कसा होतो,महिलांनी ठेवल्या डीपी चा दुरुपयोग कश्या पध्द्धती ने केला जातो हे सांगितले.उपस्थित महिलांनी मनात असलेल्या प्रश्न तुषार सरांना विचारून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळ व जे सी आई च्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी करून स्त्री शिक्षणा च्या प्रणेता सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या महान स्त्रियांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून स्त्रियांना व उपस्थित सर्व नागरिकांना इंटरनेट चा वापर करतांना ध्यायची काळजी व सायबर संबधी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
सूत्रसंचालन वैशाली सैतवाल यांनी तर आभार अनिता आंबेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रतिष्ठा महिला मंडळ व जे सी आई च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सायबर जागृतता व सतर्कता याविषयी व्याख्यान प्रसंगी बोलताना आमदार संजय सावकारे सोबत व्यासपीठावर डावीकडून,जयश्री अग्रवाल,ज्योती दरगड,तुषार परदेशी,रजनी सावकारे,लता सोनवणे,निशा मंडलेचा आदी*