मैत्रिसागर बुध्द विहार व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिका स्कैन तर्फे सावित्री फुले यांची जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – मैत्रिसागर बुध्द विहार व क्रांतीजोती सावित्रीआई फुले अभ्यासिका स्कैन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज नगर भुसावळ येथे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी नविन पाटील रेल्वे एडीआरएम एस.बी.रामटेके ,एपीओ तसेच, श्री झोंबाडे , पुनाजी पाटील , दिपक नंन्नवरे , व अभिषेक पाल ईत्यादी उपस्थित होते .
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अभ्यासिकेच्या शिक्षिका कु .वैष्णवी भेलावे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले .
मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्री आईच्या जीवनावर व कार्याची महती तसेच विद्यार्थ्यांद्वारे प्रकाशझोत टाकण्यात आला मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले .
यावेळी परिसरातील नागरिक व कार्यकर्ते व महीला मंडळ व विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले .
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिका को-आँर्डीनेटर प्रमोद निळे व दिपालीताई निळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते