माळी समाजाचा २५ डिसेंबरला वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन : परिचय पत्रक भरून घेण्याचे केलें आवाहन ;

वरणगाव – महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित माळी समाजाचा वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन २५ डिसेंबरला करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता भुसावळ तालुक्याची माळी समाजाची बैठक रविवारी वरणगावला घेण्यात आली.

या बैठकीत आगामी २५ डिसेंबरला जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह सभागृह येथे होणाऱ्या जिल्ह्यातील माळी समाजातील उपवर वर-वधु यांना एकाच छताखाली आपल्या पसंतीचा योग्य जीवनसाथी निवडता यावा तसेच वेळ, पैसा याची बचत होऊन सामोरासमोर बोलून लग्न जुडण्यास या मेळाव्याचा फायदा होतो, असे मत या बैठकीत समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र माळी समाज महासंघचे प्रदेशाध्यक्ष शालीग्राम मालकर, राज्य कार्याध्यक्ष डॉ. नलीन महाजन, जिल्हाध्यक्ष शाम महाजन, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, माळी समाज अध्यक्ष संजय माळी, सुभाष माळी, जिल्हा संघटक प्रल्हाद माळी, तालुकाध्यक्ष विजय माळी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

  • ५ डिसेंबरपर्यंत परिचय पत्र भरुन देण्याचे आवाहन

भुसावळ तालुक्यातील माळी समाजातील उपवर वधु वर यांच्या पालकांनी परिचय पत्रक निलेश माळी (भुसावळ), अनुप माळी (दिपनगर), संतोष माळी, संजय माळी, सुभाष माळी, प्रल्हाद माळी, विजय माळी (वरणगाव) यांच्याकडे परिचय फॉर्म उपलब्ध आहे. ५ डिसेंबरपर्यंत परिचय पत्रक भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे.