भुसावळ येथे ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती साजरी.


भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कूलमध्ये देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की त्यांचा जन्म ११-११-१८८८ मध्ये झाला होता.
मौलाना अबुल कलाम आझाद हे खरे देशभक्त व कुशल वक्ते आणि महान विद्वान होते. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे खंबीर समर्थक होते, जुन्या आणि नवीन विचारांमध्ये अद्भुत सामंजस्य होते. देशसेवा आणि इस्लाम सेवा हे दोन्ही एकमेकांना पूरक मानले जात होते.हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही संस्कृतींच्या अनोख्या मिश्रणाचे ते उदाहरण होते. असे मार्गदर्शन शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी केले.
यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रद्धाली घुले,कय्युम शेख,अनिस खान,अनिता वाणी,प्रतिभा काकडे,रितू प्रभु देसाई सह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.