“भुसावळ – आर्या फाउंडेशन” द्वारा संचलित “अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज” भुसावळ, पांडुरंग टॉकीज च्या मागे या ठिकाणी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचा कार्यक्रम या संपन्न करण्यात आला..

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न, संविधानकार, बोधिसत्व, परमपूज्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतीमेस प्रमुख मान्यवर एड विक्रम शेळके, एड प्रियाअडकमोल, अरुण तायडे ,डॉ वंदना वाघचौरे,प्रा। मनीषा बाविस्कर, प्रा निरांजना तायडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात येऊन, बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आली त्यानंतर सार्वजनिक रित्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविक्रीचे वाचन करण्यात आले
याप्रसंगी व्यासपीठावर भुसावळ कोर्टचे सरकारी वकील ऍड विक्रम शेळके ,ऍड रमेश पांडव ऍड प्रिया अडकमोल तसेच श्री अरुण तायडे , आर्या फौंडेशनच्या संचालिका डॉ वंदना वाघचौरे अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्रिन्सिपल मनीषा बाविस्कर उपप्राचार्य संजीव यादव सर निरंजना तायडे मॅडम इत्यादी उपस्थित होते.
सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी मोलाचे मार्गदर्शन केले. एड विक्रम शेळके यांनी- भारतीय संविधानाची जी “प्रास्ताविका” आहे त्या प्रास्ताविके मध्ये संपूर्ण संविधान दडलेले आहे. त्या संपूर्ण प्रास्ताविकेचे विवेचन करून दाखविले.
त्याचप्रमाणे एड प्रिया अडकमोल यांनी सुद्धा भारतीय स्त्रियांना कशाप्रकारे सुरक्षा कवच संविधानाद्वारे प्रदान केलेले आहे, व स्थिर स्त्रियांना कोणकोणते अधिकार दिलेले आहे. यावर आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे एड रमेश पांडव सरांनी सुद्धा संविधानाचे महत्त्व अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय संजीव यादव, व प्रिन्सिपल मॅडम मनीषा बाविस्कर यांनी केले. मनीषा बाविस्कर यांनी संविधानावर फार सुंदर अशी कविता गाऊन दाखवली, तसेच अरुण तायडे यांनी बाबासाहेबांचे कार्य व त्यांनी समाजा साठी केलेले कष्ट, त्यांच्या जीवनावर आपले विचार मांडले,
निरंजना तायडे मॅडम, यांनी “ज्याप्रमाणे घरामध्ये कोणतीही घटना घडली तर त्याची तक्रार आपण बाबाकडे करतो, आणि बाबा योग्य तो निर्णय देतात”, “तसंच जीवनामध्ये जर काही चढ उतारीच्या घटना घडल्या तर आपल्याला कोर्टात जावे लागते आणि संविधानाच्या अंतर्गत आपल्याला न्याय मिळतो”.
आणि कॉलेजच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या सुरवाडे, रेणुका उईके, रीना पारधे, यांनी सुद्धा संविधानावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर वंदना वाघचौरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
आशा पाटील,वैशाली पाटील,मनिषा ब्राहाटे, प्रजावती तायडे,तौसीफ खान वैभव खर्चे, नकुल ठोसर, कविता जाधव, सायली साळवे अश्विनी निकम,सुनीता बागुल,मीनल भालेराव, अंशिका, प्रियांका लोणारी आदींनी परिश्रम


