वरणगाव नगर परिषदचे निकृष्ट काम सुरु; काँक्रिटच्या कामामध्ये ठेकेदाराने वापरली चक्क वाळूमध्ये माती – शिवसेनेने प्रत्यक्ष पाहणी करून काम थांबविले : बांधकाम अभियंता अभय गुटाळची धृष्टराष्ट्राची भूमिका ; ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे – शिवसेनेची मागणी :

भुसावळ – वरणगाव येथील नगर परिषदेच्या माध्यमातून भोगावती नदीपात्रात सुरू असलेले काँक्रिटच्या कामांममध्ये चक्क वाळूमध्ये मातीचे मिश्रण असलेली वाळू वापरत असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाले. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम थांबविले. ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मगणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे.

वरणगाव नगरपरिषदच्या माध्यमातून भोगावती नदीपात्रामध्ये कॉलममध्ये काँक्रिट भरण्याचे काम सुरू होते. काँक्रीट मिक्सर मशीनमध्ये वाळूत माती मिश्रण असलेली टाकली जात होती. याची कल्पना शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली हिप्पी शेठ, माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी यांनी आज रविवारी दुपारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या या पाहणीमध्ये चक्क वाळूमध्ये मातीचे प्रमाण खूप जास्त असल्याने नगरपरिषदच्या सुरू असलेल्या काँक्रिटच्या कामांमध्ये वाळूच्या एवजी मातीच टाकली जात असल्याचे निदर्शनास आले. हे काम सुरू असताना नगरपरिषद बांधकाम अभियंता अभय गुटाळ यांनी या वाळूची गुणवत्ता तपासली नाही का? किंवा काम सुरू असताना नगरपरिषदचे बांधकाम विभागातील एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित का नाही? नगरपरिषदच्या ठेकेदाराला निकृष्ट काम करण्याचा आशीर्वाद कोणाचा? या सर्व प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामावर असलेल्या सुपरवायझरवर केली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्याशी बोलून निकृष्ट काम सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम अभियंता अभय गुटाळ त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असल्यास फोन घेतला नाही.

  • कलीम ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

या सर्व निकृष्ट कामांमध्ये माती मिश्रित वाळू वापरत असल्याने कामाची गुणवत्ता काय टिकेल? थूकाला थुक जोडून वरणगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याने संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष माळी, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली हिप्पीशेठ, माजी ग्रा.पं. सदस्य मध्ये सदस्य विलास वंजारी हे करणार असल्याची माहिती दिली.