भुरटया चोऱ्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची करडी नजर : बाजारपेठेत फिरते पथक तैनात :


भुसावळ – शहरात व बाजारात भुुुरटया चोरयांचे व मोटरसाइकल चोरीचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे या चोरांवर व चोरीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी
रविवारच्या बाजारात चोऱ्या, मोटार सायकल चोरी, खिसे कापणे यासारखे प्रकार होऊ नये म्हणून १७ जुलै रोजी सकाळपासून उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय शरीफ काझी, पो कॉ जावेद शहा, हे. कॉ . योगेश जाधव वाहतूक पोलिस स्टाफ व पूर्ण आरसीपी प्लाटून यांचे पथक आठवडे बाजार व परिसरात फिरत होते . दरम्यान बेशिस्त वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली .