भुसावळ – पुणे – भुसावळ या दैनंदिन एक्स्प्रेस गाड्यांची सेवा खालील तपशिलानुसार पूर्ववत करीत आहे

भुसावळ – पुणे – भुसावळ एक्सप्रेस दैनिक
भुसावळ ,- 11026 पुणे – भुसावळ एक्स्प्रेस दि. १०.७.२०२२ पासून पुढील सूचनेपर्यंत पुणे येथून दररोज ११.४० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी २२.०० वाजता पोहोचेल.
11025 भुसावळ – पुणे एक्स्प्रेस दि. ११.७.२०२२ पासून पुढील सूचनेपर्यंत भुसावळ येथून दररोज ००.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.०५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव (फक्त 11025 साठी), पाचोरा आणि जळगाव.
संरचना: एक वातानुकूलित चेअर कार, ६ द्वितीय श्रेणी चेअर कार (आरक्षित), ७ द्वितीय श्रेणी चेअर कार (अनारक्षित), एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.


