लोकमान्य टिळक टर्मिनस – मनमाड अतिजलद विशेष ट्रेनला मुदतवाढ

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मनमाड दरम्यान अतिजलद विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे.

02101 लोकमान्य टिळक टर्मिनस – मनमाड अतिजलद विशेष दि. १.७.२०२२ ते ३०.९.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

02102 मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद विशेष दि. ०१.०७.२०२२ ते ३०.०९.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 02101/02102 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ३०.६.२०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.