भुसावळ डीवायएसपी यांचा दणका ; रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई :

भुसावळ – शहरातील नॅशनल हायवे क्र.6 वरील सुभाष गॅरेज समोर साकेगाव कडुन भुसावळकडे रेतीची डंपरने
चोरटी वाहतुक केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळल्यावरून पथकाला कार्यालयात बोलवुन सांगितले सदर रेतीची चोरटी वाहतुक बाबत खात्री केली असता अवैध रेती मिळून आल्याने भुसावळ डीवायएसपी यांनी दणका देत रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोना.संकेत अरुण झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकेगाव कडुन भुसावळकडे रेतीची चोरटी वाहतुक करीत होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्या वरून पोहेकॉ रमण सुरळकर तसेच पोना यासीन पिंजारी दोन्ही नेमणूक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अशांना उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांनी त्यांचे कार्यालयात बोलवुन मिळालेल्या माहितीची खात्री करून कारवाई करण्यात सांगितले.

दिनांक 01/07/2022 रोजी 02.35 वाजेच्या सुमारास नॅशनल हायवे क्र.6 वरील सुभाष गॅरेज समोर साकेगाव कडुन भुसावळकडे येणा-या रोडवर पथक सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाळूने भरलेले वाहन थांबवुन खात्री केली असता आरोपी नामे दिपक भिमा ठाकरे वय 23 रा. साकेगाव भवानी नगर ता.भुसावळ हा 10,000/- रु किमतीची दोन ब्रास रेती शासनांची गौण खनीज संपत्ती त्याचे ताब्यातील डंपर क्र.एम एच 19 सी.वाय 1679 यामध्ये भरुन चोरटी वाहतुक करतांना मिळुन आला म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून त्यांचेविरुद्ध कायदेशिर फिर्याद देण्यात आली असून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोना.संकेत अरुण झांबरे 2003,पोहेकॉ 3189 रमण सुरळकर तसेच पो ना 37 यासीन पिंजारी अशांनी मिळून केली.

रेती माफियांनी दंबगिरी ….
महसूल विभाग व पोलीस विभागाने अवैध रेती कारवाई करतांच घटनास्थळी रेती माफिया राजकीय गुंड व भाईगिरी करणाऱ्यांना बोलावून महसूल विभाग व पोलीस विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात.जेणे करून महसूल विभाग व पोलीस विभागाने अवैध रेतीच्या वाहनांवर कुठलीही कारवाई न करता सोडून दयावे असा फंडा रेती माफिया सुरू असून एक प्रकारे रेती माफियांनी दंबगिरी सुरू आहे.

एका पावतीवर दहा वाहने ….
रेती माफियांचा नवीन फंडा सुरू असून दिवस भरातून एक पावती घेऊन त्या पावतीच्या आधारे दिवस भरातून दहा ट्रिप रेती माफिया करीत आहे.जर महसूल विभागाच्या एखाद्या अधिकाऱ्याने रस्त्यामध्ये
कारवाईसाठी रेतीचे भरलेले वाहन अडविले तर त्या अधिकाऱ्यास पावती दाखविली जाते.

रेतीचे कित्येक वाहने बिना क्रमांकाचे …
घर बांधकाम करण्यासाठी रेती ही अत्यावश्यक बाब आहे जर रेतीचे नाही मिळाली तर घराचे बांधकाम कसे पूर्ण होणार याचाच फायदा रेती माफिया घेत असून सध्या रेती माफियांची चांदी असल्याने ग्राहकांना ज्यादा दराने रेती खरेदी करावी लागत आहे. यासाठी रेती माफिया गाव गुंड व राजकीय गुंड यांच्या आशीर्वादाने महसूल विभाग व पोलीस विभागावर दबाव निर्माण करीत रेतीचे कित्येक वाहने बिना क्रमांकाचे सुरू आहे.