भुसावळ – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन भुसावळ द्वारा दि२२ रोजी महिलादिन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम कृष्णचंद्र सभागृहात दुपारी दोन वाजता घेण्यात आले यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सहाय्यक महामंत्री कॉम कामाक्षी बागलवाडीकर व कॉम स्वाती म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन पुष्पा खाडे यांनी केले कामाक्षी बागलवाडीकर यांनी महिला दिवसाच्या सर्व रेल्वे महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन चांगली काम करण्याचे आवाहन केले कॉम स्वाती म्हात्रे, मंडळ सचिव आर आर निकम,व मंडळ अध्यक्ष पुष्पेन्द्र कापडे यांनी महिलांना सूचना केल्या महिलांनी पुढे येऊन समाज उपयोगी कार्य करावे, महिलांना युनियन मध्ये मोठ्या पदाधिकाऱ्यांची पदे दिली आहे त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यालयातून आलेल्या महिला सहाय्यक महामंत्री होय,युनियनने या महिलांसाठी महिला टीम तयार केली आहे त्यात महिलांनी सक्रिय भाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले,यावेळी वक्तृत्व स्पर्धा, मेहंदी स्पर्धा ,संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विजयी झालेल्या पहिल्या व दुसऱ्या महिलांना बक्षिसे कामाक्षी बागलवाडीकर व स्वाती म्हात्रे, आर आर निकम, पुष्पेंद्र कापडे यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी रेल्वेतील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रसंगी पुष्पा कींडो,वनिता जाधव,पल्लवी अंबाडे,दीपा स्वामी,वर्षा जाधव,लीना बोंडे, पल्लवी चौधरी,सुनंदा डांगे, कविता देवगन,करुणा कुमारी,इंदीरा दमाडे, दिपाली बोबडे ,हर्षा रोटे,अक्षता गडवाल,ज्योती अडवाल,अलका बाविस्कर,विषाखा पगारे, इसरार खान,जी जी ढोले,पी पी बेंडाळे,ए.टी.खंबायत,योगेश बारी,अनंत झोपे, लेखराज राजपूत यांनी परिश्रम घेतले.
––—–



