नाहाटा महाविद्यालयात रासेयो एकका तर्फे ” शहीद दिवस ” साजरा

.
भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ , कला विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत ‘ शहीद दिवस’ देशभक्तीपर गीत गायन द्वारे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि महाविद्यालयाचे प्राचार्य सौ. डॉ. एम व्ही. वायकोळे या उपस्थित होत्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर.एस.नाडेकर, माहिला कार्यक्रम अधिकरी प्रा. डॉ ममताबेन पाटील व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे यांचीही उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर एस नाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यांनी भारत हा माझा देश आहे आणी त्याचा मला अभिमान आहे, असे त्यांच्या मानोगतात सांगितले. शहीद दिवस आपन का साजरा करावा यावर सर्वाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमार आदित्य हिवरे व कल्याणी पराळे यांनी केले. अंकुश मगरे व आदित्य तायडे यांनी खुप छान असे मनोगत व्यक्त केले व त्यांनी सुखदेव, राजगुरु, भगतसींग यांचे जीवन कार्य सांगीतले. गायत्री बजाज व कविता वायकोळे यांनी बालसागर भारत होवो। सुन्दर असे गीत सदर केले. आकांशा चांदेकर यांनी राष्ट्रकी प्रेरणाका गान वन्देमातरम हे गीत म्हटले, देश भक्ति वर गीत संजना दोधानी यांच्या ग्रुपने सादर केले .
वन्दे-मातरम् वन्दे -मातरम्…..,
आशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.विलास महिरे यांनी केले.
सदर कार्यक्रमात रासेयोचे स्वयंसेवक कु. कल्याणी पराळे, सागर सोनवणे, आकाश बाविस्कर,खुशाल मानकर, तारकेश्वरी सोनवणे, स्वप्निल डोळसे,रोहित पुल्लिवार, आदित्य हिवरे, गायत्री बजाज, नेहा पाटील, संजना दोधानी, कांचन पाटील,वैशाली पाटील,हेमांशी तायडे, वैभव बोदड़े, सुजय वाघोड़े इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी व उपप्राचार्य प्रा.डॉ. एन. ई. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.