भुसावळात आम आदमी पार्टीचे सभासद अभियानास प्रारंभ


भुसावळ- येथील महात्म्या गांधी पुतळ्या यावल नाका जवळ संध्याकाळी 6 वाजता आम आदमी पार्टीचे सभासद अभियान जळगाव जिल्हा संयोजक प्रा तुषारजी निकम व रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख युवराज महाजन यांचा आदेशाने आयोजित करण्यात आले या सभासद अभियानाचा सुरवातीला महात्मा गांधी यांचा पुतळ्यास अभिवादन करून सभासद अभियान सुरवात करीत आजचा अभियानास शहरातील जनतेने उत्कृष्ट प्रतीसाद देत स्वता सहभाग घेऊन सदस्यत्व स्वीकारत पदाधिकारी यांचे मनोबल वाढविले व केजलीवालजी यांचा नेतृत्वावर विश्वास दाखवत या पुढे पक्ष वाढीसाठी जिवापाड मेहनत घेऊ असे आश्वासन देत या सदस्यता अभियानास यशस्वी केले या साठी कैलासजी उपाध्याय, भुसावळ तालुका संयोजक प्रमोद पाटील जिल्हा अल्पसंख्याक संयोजक इर्शाद खान तालुका सचिव सलमान तडवी माजी नगरसेवक दिलीपजी सुरवाडे संतोष सोनवणे अभिनव वराडे स्वराज महाजन युवा शहर संयोजक करन लखन कछवे भाऊ शे जावेद भाई इजाज भाई यांनी मेहनत घेत सभासद अभियान यशस्वी केले