भुसावळ – शहरातील नाहाटा चौफुली जवळील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाजवळ गोसेवक मित्र परिवारा तर्फे शहीद दिनानिमीत्त शहीद भगतसिग राजगुरु व सुकदेव यांना आदरांजली देण्यात आली
सर्व प्रथम भारत मातेला पुर्वा नेवे या बालिकेच्या हातून पुष्पहार घालुन आदरांजली वाहिली . प्रसंगी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी श्रध्दाजंली वाहीली. यावेळी पत्रकार उज्वला बागुल , सौ राजश्री नेवे , यांचेसह
सर्व उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहून मानवंदना दिली .
आपले सर्वाचे कर्तव्य देश सेवेसाठी असुन आपल्या वरील अनत उपकार आहेत शहीद क्रांतीवींराचे आपन व येणाऱ्या पिढीने सदैव देशसेवेची चळवळ एकनिष्टता व देशासाठी समर्पण करावे असे मनोगत रोहित महाले यानी व्यक्त केले तसेच सखी श्रावणीचे अध्यक्ष सौ राजश्री नेवे यांनी शहीद क्रातीवीरानी आपले जीवन देशसेवेसाठी दिले त्यानी खुपच दुखदायक वेदना सहन करुन आपल्यासाठी सर्वासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली सर्वांनी याचे भान ठेवावे व देशसेवेसाठी आपले योगदान द्यावे आवाहन केले यावेळी दोन मिनीट शांत उभे राहुन सर्वानी श्रध्दाजंली वाहीली . यावेळी
प्राणीमित्र रोहित महाले ,चेतन पवार, मयुर सावकारे ,अनिकेत साळी ,रुषी पाटील ,सर्प मित्र किरण पाटील निलेश पाटील व समस्त नागरीक उपस्थित होते .



